आतां कांहीं सोस न – संत तुकाराम अभंग – 572

आतां कांहीं सोस न – संत तुकाराम अभंग – 572


आतां कांहीं सोस न करीं आणीक । धरीन तें एक हेचि दृढ ॥१॥
जेणें भवसिंधु उतरिजे पार । तुटे हा दुस्तर गर्भवास ॥ध्रु.॥
जोडीन ते आतां देवाचे चरण । अविनाश धन परमार्थ ॥२॥
तुका म्हणे बरा जोडला हा देह । मनुष्यपण इहलोका आले ॥३॥

अर्थ

आता मी कोणताही सोस हव्यास करणार नाही.फक्त विठ्ठलाचे चरण दृढ धरीन.म्हणजे संसार सागरतून पलीकडे उतरता येईल.व दुस्तर असा गर्भवास टळेल.अविनाशी परमार्थाचे धन म्हणजेच देवाचे पाय त्यास हात जोडीन.तुकाराम महाराज म्हणतात जो दूर्लभ असा मनुष्य देह आहे या मनुष्यलोकात मी आलो हा मोठाच फायदा मला प्राप्त झाला आहे.


अभंग विडिओ स्वरूपात पहा .

आतां कांहीं सोस न – संत तुकाराम अभंग

संत  तुकाराम अँप डाउनलोड रा.