जेथें जावें तेथें कपाळ सरिसें – संत तुकाराम अभंग – 571

जेथें जावें तेथें कपाळ सरिसें – संत तुकाराम अभंग – 571


जेथें जावें तेथें कपाळ सरिसें । लाभ तो विशेषें संतसंगें ॥१॥
पूर्व पुण्यें जरि होतीं सानकूळ । अंतरायमूळ नुपजे तेथें ॥ध्रु.॥
भाग्य तरी नव्हे धन पुत्र दारा । निकट वास बरा संतांपायीं ॥२॥
तुका म्हणे हेचि करावी मिरासी । बळी संतांपाशीं द्यावा जीव ॥३॥

अर्थ

जिथे जिथे आपण जाऊ तिथे प्रारब्ध आपल्याबरोबरच येत असते परंतु संतांच्या संगतीने आपल्याला एक प्रकारचा विशेष लाभ होतो. आपले जर पूर्वपुण्य अनुकूल असेल तरच आपल्याला संत संगतीचे लाभ घडतो संतांचे संगतीत खंड कधीही घडत.संतांचा वियोग करणारे बीजच उत्पन्न होणार नाही.लोकांना वाटेते की पत्नी,पुत्र,द्रव्य यांचा लाभ म्हणजे मोठे भाग्य.पण खरे भाग्य म्हणजे संतांच्या पाया पाशीच राहावे आणि त्यांची सेवा करावी.तुकाराम महाराज म्हणतात मी संतांच्या पाया पाशी वतनदारी असून त्यांच्या पायापाशी जीव हि अर्पण करीन अशी भक्ती दे.


अभंग विडिओ स्वरूपात पहा .

जेथें जावें तेथें कपाळ सरिसें – संत तुकाराम अभंग

संत  तुकाराम अँप डाउनलोड रा.