न ये नेत्रां जळ – संत तुकाराम अभंग – 57
न ये नेत्रां जळ ।
नाहीं अंतरीं कळवळ ॥१॥
तों हे चावटीचे बोल ।
जन रंजवणें फोल ॥ध्रु.॥
न फळे उत्तर ।
नाहीं स्वामी जों सादर ॥२॥
तुका म्हणे भेटी ।
जंव नाहीं दृष्टादृष्टी ॥३॥
अर्थ
ज्याच्या नेत्रांमध्ये परमेश्वराबद्दल प्रेमाने पाणी येत नाही, ज्याच्या अंतरि भक्तीचि तळमळ नाही .त्याचे बोल हे वृथा लोकांना रंजविणारे असतात .आणि असे रंजक बोल निष्फळ ठरतात .ज्याच्या मना मध्ये आपल्या स्वामी हरी,गुरु विषयी आदर नसतो त्यांनी उपदेश फल्द्रुप होत नाही. तुकाराम महाराज म्हणतात,जो पर्यंत समोरा समोर भेट होत नाही तो पर्यंत आम्ही भेटलो म्हणणे उपयोगाचे नाही .
हा अभंग विडिओ स्वरूपात पहा .
न ये नेत्रां जळ – संत तुकाराम अभंग
संत ज्ञानेश्वर अँप डाउनलोड करा.