भवसिंधूचें हेंचि तारूं – संत तुकाराम अभंग – 567
भवसिंधूचें हेंचि तारूं । मज विचारूं पाहातां ॥१॥
चित्तीं तुझे धरिन पाय । सुख काय तें तेथें ॥ध्रु.॥
माझ्या खुणा मनापाशीं। तें या रसीं बुडालें ॥२॥
तुका म्हणे वर्म आलें । हातां भलें हें माझ्या ॥३॥
अर्थ
देवा तुमचे चरण म्हणजे याभवसिंधु मधून तारून नेणारी नौकाच आहेत.त्यामुळे मी तुमचे चरण माझ्या हृदयात साठवून ठेवले आहे कारण सुख म्हणजे काय आहे ते सर्व काही या तुमच्या चरणामध्ये आहे.या परमार्थाच्या खुणा माझ्याजवळ आहेत आणि माझे मन तर आता हरी रसात अगदी बुडून गेले आहे.तुकाराम महाराज म्हणतात तुझे चरण म्हणजे सुखाचे साधन आहे आणि आता हे वर्म माझ्या हाती लागले आहे ते बरे झाले.
अभंग विडिओ स्वरूपात पहा .
भवसिंधूचें हेंचि तारूं – संत तुकाराम अभंग
संत तुकाराम अँप डाउनलोड करा.