आपुलाल्या तुम्ही रूपासी – संत तुकाराम अभंग – 564

आपुलाल्या तुम्ही रूपासी – संत तुकाराम अभंग – 564


आपुलाल्या तुम्ही रूपासी समजा । कासया वरजा आरसिया ॥१॥
हें तों नव्हे देहबुद्धीचें कारण । होईल नारायणें दान केलें ॥ध्रु.॥
अब्रूचिया बाणें वर्मासि स्पर्शावें । हें तों नाहीं ठावें मोकलित्या ॥२॥
तुका म्हणे बहु मुख या वचना । सत्याविण जाणा चाली नाहीं ॥३॥

अर्थ

आपले रूप कसे आहे,हे तुम्ही समजून घ्या.आरश्यावर रागवून काय उपयोग आहे?मी तर “देह” असा विचार केलातर सोंदर्य प्राप्त होत नाही तर,देवाने नारायणाने कृपा केली तर सोंदर्य प्राप्त होईल.एखाद्याने दुष्ट वचने बोलली त्याचे तर दुसऱ्याला दुख होते हे त्याला कळत नाही,बाण सोडणाऱ्याला ज्याला बाण लागला तो किती दुःखी झाला,हे कळत नाही.तुकाराम महाराज म्हणतात खरे बोलण्यात सुख सामावलेले आहे.परमार्थ हा सत्यावर आधारित आहे.हे जाणावे.


अभंग विडिओ स्वरूपात पहा .

आपुलाल्या तुम्ही रूपासी – संत तुकाराम अभंग

संत  तुकाराम अँप डाउनलोड रा.