कैवल्याच्या तुम्हां घरीं – संत तुकाराम अभंग – 563

कैवल्याच्या तुम्हां घरीं – संत तुकाराम अभंग – 563


कैवल्याच्या तुम्हां घरीं । राशी हरी उदंडा ॥१॥
मजसाठीं कां जी वाणी । नव्हे धणी विभागा ॥ध्रु.॥
सर्वा गुणी सपुरता । ऐसा पिता असोनी ॥२॥
तुका म्हणे पांडुरंगा । जालों सांगा सन्मुख ॥३॥

अर्थ

हरी,तुमच्या घरी मोक्षाच्या पुष्कळ राशी आहेत.मग माझ्या साठी त्या गोष्टींची उणीव का बरे आहे?मला आनंदाचा वर का बरे मिळत नाहि?तू सर्वगुण संपन्न पिता असून माझ्या बाबतीत अशी उणीव का?तुकाराम महाराज म्हणतात देवा मी तुमच्या समोर माझे हृदय प्रकट केले आहे आता मला सर्व काही सांगा.


अभंग विडिओ स्वरूपात पहा .

कैवल्याच्या तुम्हां घरीं – संत तुकाराम अभंग

संत  तुकाराम अँप डाउनलोड रा.