पुढिलाचें इच्छी फळ – संत तुकाराम अभंग – 562
पुढिलाचें इच्छी फळ । नाहीं बळ तें अंगीं ॥१॥
संत गेले तया ठाया । देवराया पाववीं ॥ध्रु.॥
ज्येष्ठांचीं कां आम्हां जोडी। परवडी न लभों ॥२॥
तुका म्हणे करीं कोड । पुरवीं लाड आमुचा ॥३॥
अर्थ
साधुं संतांनी जे काही आनंदरुपी फळ प्राप्त केले त्या आनंदाची मी इच्छा करत आहे.पण माझ्या अंगी अजून बळ नाही.संत ज्या सर्वश्रेष्ठ स्थानाला जाऊन पोहचले,हे देवराया तेथे तुम्हीच मला नेऊन पोहचवा. संतांना जे काही प्राप्त झाले ते मला कबरे प्राप्त होऊ नये.तुकाराम महाराज म्हणतात तुम्ही आमचे कोड करा व आमचे लाड पूरवा.
अभंग विडिओ स्वरूपात पहा .
पुढिलाचें इच्छी फळ – संत तुकाराम अभंग
संत तुकाराम अँप डाउनलोड करा.