एकी केली हातोफळी – संत तुकाराम अभंग – 561
एकी केली हातोफळी । ठाया बळी पावले ते ॥१॥
आम्ही देवा शिक्तहीनें । भाकुं तेणें करुणा ॥ध्रु.॥
पावटणी केला काळ । जया बळ होतें तें ॥२॥
तुका म्हणे वीर्यावीर । संतधीर समुद्र ॥३॥
अर्थ
प्रेमाने बलवान असणाऱ्या संताने टाळी वाजवून ईश्वराची प्राप्ती करून घेतली,पण देवा मी शक्ती हीन आहे.म्हणून आम्ही तुमची करूणा भाकत आहोत.ज्यांच्या अंगामध्ये वैराग्याचे बळ होते,त्यांनी काळाला जिंकले.तुकाराम महाराज म्हणतात संत म्हणजे शुरांपेक्षाही शूर आहेत धैर्याचे महासागर आहेत.
अभंग विडिओ स्वरूपात पहा .
एकी केली हातोफळी – संत तुकाराम अभंग
संत तुकाराम अँप डाउनलोड करा.