काय करूं कर्माकर्म – संत तुकाराम अभंग – 560

काय करूं कर्माकर्म – संत तुकाराम अभंग – 560


काय करूं कर्माकर्म । बरें सांपडलें वर्म ॥१॥
होसी नामाच सारिखा । समजाविली नाहीं लेखा ॥ध्रु.॥
नाहीं वेचावेच जाला । उरला आहेसी संचला ॥२॥
तुका म्हणे माझें । काय होईल तुम्हां ओझें ॥३॥

अर्थ

कर्माकर्म करून तरी काय करू?मला विठ्ठल नामाचे वर्म सापडले आहे.देवा तूतुझ्या नावाप्रमाणेच कृती करतोस.तू अगदी प्रेमळ आहेस.तू अनेक भक्तांचे उद्धार केले आहेस याचे तुला देखील मोजमाप करता येणार नाही?तू आंनदरूप आहेस,कमी होत नाही,ज्यादाही होत नाहीस,तू आहे तसा आहे.तुकाराम महाराज म्हणतात माझा अंगीकार केला तर तुला ओझे होईल का?


अभंग विडिओ स्वरूपात पहा .

काय करूं कर्माकर्म – संत तुकाराम अभंग

संत  तुकाराम अँप डाउनलोड रा.