योगाचें तें भाग्य क्षमा – संत तुकाराम अभंग – 56

योगाचें तें भाग्य क्षमा – संत तुकाराम अभंग – 56


योगाचें तें भाग्य क्षमा ।
आधीं दमा इंद्रियें ॥१॥
अवघीं भाग्यें येती घरा ।
देव सोयरा जालिया ॥ध्रु.॥
मिरासीचें म्हूण सेत ।
नाहीं देत पीक उगें ॥२॥
तुका म्हणे उचित जाणां ।
उगीं सिणा काशाला ॥३॥

अर्थ
योगाचे भाग्य हे क्षमा आहे जो इंद्रियांचे दमन करतो ज्याच्या चित्तामधे क्षमा असते तो योगी असतो .त्या मुळे देव त्याचा सोयरा होतो आणि त्याला सर्व सुखांची प्राप्ति होते .ज्या प्रमाणे ईनामी मिळालेल्या शेतातसुद्धा कष्ट केल्याशिवाय पिक येत नाही . तुकाराम महाराज म्हणतात , योग्य अयोग्य जाणुन घ्या , नाहीतर वृथा शिण होईल.


हा अभंग विडिओ स्वरूपात पहा .


योगाचें तें भाग्य क्षमा – संत तुकाराम अभंग

संत ज्ञानेश्वर अँप डाउनलोड रा.