चंदनाच्या वासें धरितील – संत तुकाराम अभंग – 554

चंदनाच्या वासें धरितील – संत तुकाराम अभंग – 554


चंदनाच्या वासें धरितील नाक । नावडे कनक न घडे हें ॥१॥
साकरेची गोडी सारिखी सकळां । थोरां मोठ्या बाळां धाकुटियां ॥२॥
तुका म्हणे माझें चित्त शुद्ध होतें । तरि का निंदित जन मज ॥३॥

अर्थ

चंदनाचा सुगंध आला तर कोणी नाक धरून बसेल काय?कनक(सोने)कोणाला आवडणार नाही,असे होईल काय?साखरेची गोडी लहान अथवा मध्यम किंवा थोर वयाच्या लोकांना सारखीच असते.तुकाराम महाराज म्हणतात माझे चित्त जर शुध्द असते तर लोकांनी माझी निंदा कधीच केली नसती.


अभंग विडिओ स्वरूपात पहा .

चंदनाच्या वासें धरितील – संत तुकाराम अभंग

संत  तुकाराम अँप डाउनलोड रा.