संतांचीं उच्छिष्टें बोलतों – संत तुकाराम अभंग – 553
संतांचीं उच्छिष्टें बोलतों उत्तरें । काय म्यां गव्हारें जाणावें हें ॥१॥
विठ्ठलाचे नाम घेता नये शुद्ध । तेथें मज बोध काय कळे ॥ध्रु.॥
करितो कवित्व बोबडा उत्तरी । झणी मजवरी कोप धरा ॥२॥
काय माझी याति नेणां हा विचार । काय मी तें फार बोलों नेणें ॥३॥
तुका म्हणे मज बोलवितो देव । अर्थ गुह्य भाव तोचि जाणे ॥४॥
अर्थ
मी माझ्या अभंगातून जे काही बोललो,ते पूर्वी झालेल्या महान संतानी सांगितले आहे मी जे काही बोलतोय ते संतांचे उच्छिष्ट बोल आहे.नाहीतर माझ्या सारख्या गावंढळ माणसाने काय बरे सांगावे.विठ्ठलाचे नाम मला निट घेता येत नाही.अशा स्तीतीत मला आत्मज्ञान कसे होणार?मी कौतुकाने,प्रेमाने बोलत आहे.हे माझे बोबडे बोल आहेत.तरी माझ्यावर कोणी रागावू नका.मो कोण आहे हे तुम्हाला माहित आहे ना मग या विषयी मी अधिक बोलणे योग्य नाही.तुकाराम महाराज म्हणतात माझ्या मुखातून देवच बोलत आहे त्याचा गूढ अर्थ तोच जाणत आहे.
अभंग विडिओ स्वरूपात पहा .
संतांचीं उच्छिष्टें बोलतों – संत तुकाराम अभंग
संत तुकाराम अँप डाउनलोड करा.