दुःखाचे डोंगर लागती – संत तुकाराम अभंग – 545

दुःखाचे डोंगर लागती – संत तुकाराम अभंग – 545


दुःखाचे डोंगर लागती सोसावे । ऐसें तंव ठावें सकळांसीं ॥१॥
कांहीं न करिती विचार हिताचा । न करिती वाचा नामघोष ॥ध्रु.॥
भोगें कळों येती मागिल ते जन्म । उत्तम मध्यम कनिष्ठ ते ॥२॥
तुका म्हणे येथें झांकितील डोळे । भोग देते वेळे येईल कळों ॥३॥

अर्थ

दुःख डोगरा एवढे आहे हे माहित असून हि लोक आपल्या हिताचा विचार का करत बरे करत नाही देवाच्या नामाचा घोष का करत नाही?या जन्मात आपल्याला जे सुःख दुःख भोगावे लागते त्यावरून मागील जन्म उत्तम,मध्यम,कनिष्ट कोणता होता हे समजून येते.तुकाराम महाराज म्हणतात वर्तमान काळात जर आपण चांगले वागण्या बद्दल डोळे झाक केली,तर आपणास त्याचे प्रायश्चित्त हे भोगावे लागेल आणि त्यावेळी आपल्या वागण्याची चूक कळून येईल.


अभंग विडिओ स्वरूपात पहा .

दुःखाचे डोंगर लागती – संत तुकाराम अभंग

संत  तुकाराम अँप डाउनलोड रा.