रडे अळंकार दैन्याचिये – संत तुकाराम अभंग – 544

रडे अळंकार दैन्याचिये – संत तुकाराम अभंग – 544


रडे अळंकार दैन्याचिये कांती । उत्तमा विपत्तीसंग घडे ॥१॥
एकाविण एक अशोभ दातारा । कृपेच्या सागरा पांडुरंगा ॥ध्रु.॥
रांधूं नेणे तया पुढील आइतें । केलें तें सोइतें वांयां जाय ॥२॥
तुका म्हणे चिंतामणि शेळी गळा । पावे अवकळा म्हणउनी ॥३॥

अर्थ

अलंकार चांगले असेल आणि परीधन करणारा मनुष्य निस्तेज असेल,तर तो चांगला दिसत नाही कारण तो मनुष्य अलंकार परिधान करण्यास सुशोभित नाही म्हणून.हे कृपेच्या सागरा पांडुरंगा ,जगा मध्ये एकवाचून एक शोभत नाही म्हणजे उत्कृष्ट दिसण्यासाठी दोन्ही गोष्टी योग्यतेच्या लागतात. ज्याला स्वयंपाकच जमत नाही त्यांच्या पुढे स्वयंपाक बनवण्याची सामग्री ठेऊन वाया जाईल.तुकाराम महाराज म्हणतात शेळीच्या गळ्यात चिंतामणी बांधला तर तिला त्याचा काय उपयोग.


अभंग विडिओ स्वरूपात पहा .

रडे अळंकार दैन्याचिये – संत तुकाराम अभंग

संत  तुकाराम अँप डाउनलोड रा.