द्रव्याचिया मागें किळ – संत तुकाराम अभंग – 543

द्रव्याचिया मागें किळकाळाचा – संत तुकाराम अभंग – 543


द्रव्याचिया मागें किळकाळाचा लाग । म्हणोनियां संग खोटा त्याचा ॥१॥
निरयाचें मूळ घालुनिया मागें । मांडिली प्रसंगें कथा पुढें ॥ध्रु.॥
आजिच्या प्रसंगें हाचि लाभ घ्यावा । पुढील भार देवावरी घाला ॥२॥
प्रारब्ध कांहीं न पालटे सोसें । तृष्णेचें हें पिसें वांयांविण ॥३॥
तुका म्हणे घेई राहे ऐसें धन । सादर श्रवण करोनियां ॥४॥

अर्थ

धनाच्या मागे काळ लागलेला असतो.धनाचि संगत हि खरोखर खोटी आहे. धन कितीही मिळविले तरी समाधान नाही.धनाचा अति लोभ हे नरकाचे मुळ आहे.त्याच त्याग करून मी आता अक्षयरूप हरी कथा सांगत आहे.आज या भगवंताच्या लीलाविलासाच्या कथेचा लाभ घ्या आणि प्रपंचाचा भार भगवंताच्या चरणावर अर्पण करा.तो तुमचा योगक्षेम सांभाळील.आपल्या प्रारब्धात असेल ते काही बदलत नाही.त्यामुळे धनाची एकसारखी लालसा व्यर्थ आहे.तुकाराम महाराज म्हणतात भगवंताचे नाम श्रवण करून तेच धन जतन करा व तेच धन आपल्या जवळ राहणार आहे.


अभंग विडिओ स्वरूपात पहा .

द्रव्याचिया मागें किळकाळाचा – संत तुकाराम अभंग

संत  तुकाराम अँप डाउनलोड रा.