द्रव्याचा तो आम्ही – संत तुकाराम अभंग – 542
द्रव्याचा तो आम्ही धरितों विटाळ । तया पाठी काळ लाग करी ॥१॥
करोनियां हेचि राहिलों जीवन । एक नारायण नाम ऐसें ॥२॥
तुका म्हणे हेचि करुनि जतन । आलिया ही दान याचकासी ॥३॥
अर्थ
आम्ही द्रव्याचा(पैसे,धन)याचा विटाळ मानलेला आहे.कारण या द्रव्याच्या मागे काळ लागलेला असतो.आता द्रव्या पेक्षा नारायण रुपी धनाचा विचार केलेला आहे.नारायणाचे नाम हेच माझे जीवन झाले आहे.तुकाराम महाराज म्हणतात आणि आम्ही नारायण रुपी धन हे हृदयात जतन करून ठेवले आहे.आणि हेच धन आम्ही याचकाला देत आहोत.
अभंग विडिओ स्वरूपात पहा .
द्रव्याचा तो आम्ही – संत तुकाराम अभंग
संत तुकाराम अँप डाउनलोड करा.