जीवनमुक्त ज्ञानी झाले – संत तुकाराम अभंग – 541
जीवनमुक्त ज्ञानी झाले जरी पावन । त्यजावा दुर्जन संगति ही ॥१॥
बहुत अन्न विष मोहरीच्या मानें । अवघेचि तेणें विष होय ॥२॥
तुका म्हणे जेणें आपुलें स्वहित । तैसी करीं नीत विचारूनि ॥३॥
अर्थ
एखादा मनुष्य,परमज्ञानी बनला,तरी देखील त्याने दुर्जनाची संगती कधी करू नये.अन्न पुष्कळ असले,तरी मोहरी एवढ्या विषाने सुद्धा त्या सर्व अन्नात विष पसरले जाते.तुकाराम महाराज म्हणतात ज्या मध्ये आपले खरे हित आहे,अशा नीतीने वागावे.
अभंग विडिओ स्वरूपात पहा .
जीवनमुक्त ज्ञानी झाले – संत तुकाराम अभंग
संत तुकाराम अँप डाउनलोड करा.