उचित जाणावें मुख्य – संत तुकाराम अभंग – 540

उचित जाणावें मुख्य – संत तुकाराम अभंग – 540


उचित जाणावें मुख्य धर्म आधीं । चित्तशुद्ध बुद्धी ठायीं स्थिर ॥१॥
न घालावी धांव मनाचिये ओढी । वचनी आवडी संताचिये ॥२॥
अंतरीं या राहे वचनाचा विश्वास । न लगे उपदेश तुका म्हणे ॥

अर्थ

आपण आपले चित्त शुध्द करावे.बुद्धी परमेश्वराच्या चरणकामालांशी स्थिर करावी.हे धर्माचे वर्म योग्य प्रकारे जाणून घ्यावे.केवळ मनाच्या ओढीने धावत सुटू नये.संतांच्या वाचनाचा आवडीने अभ्यास करावा.तुकाराम महाराज म्हणतात संताचा विश्वास हृदयात स्थिर झाला,की मग त्याला वेगळा उपदेश करावा लागणार नाही.


अभंग विडिओ स्वरूपात पहा .

उचित जाणावें मुख्य – संत तुकाराम अभंग

संत  तुकाराम अँप डाउनलोड रा.