अक्षरांचा श्रम केला – संत तुकाराम अभंग – 539

अक्षरांचा श्रम केला – संत तुकाराम अभंग – 539


अक्षरांचा श्रम केला । फळा आला तेणें तो ॥१॥
अवघियाचा तळ धरी । जीवा उरी नुरवुनी ॥ध्रु.॥
फळलें तें लवे भारें । पिक खरें आलें तई ॥२॥
तुका म्हणे हा गे देव । पुढें भाव सारावा ॥३॥

अर्थ

मी वेद अक्षरांचे पाठांतर करून श्रम केले,म्हणून मला आता त्याचे चांगले फळ मिळत आहे.”मी” म्हणजे शरीराचा भवाच उरला नाही.सर्व प्राणी मात्रांच्या ठिकाणी मी अत्यंत विनम्र झालो आहे.वृक्षाला ज्यादा फळे आली,की तो खाली वाकतो म्हणजे नम्र होतो.त्यावरून त्याला पुष्कळ फळे आली आहेत,असे समजावे.तुकाराम महाराज म्हणतात देवाच्या पुढेही आपण असाच नम्र भाव अर्पण करावा.


अभंग विडिओ स्वरूपात पहा .

अक्षरांचा श्रम केला – संत तुकाराम अभंग

संत  तुकाराम अँप डाउनलोड रा.