मागें संतीं होतें जें जें – संत तुकाराम अभंग – 538

मागें संतीं होतें जें जें – संत तुकाराम अभंग – 538


मागें संतीं होतें जें जें सांगितलें । तें येऊं लागलें अनुभवा ॥१॥
आचारभ्रष्ट होती लोक कली । पुण्य क्षीण बळी जालें पाप ॥ध्रु.॥
वर्णधर्म कोण न धरी विटाळ । घालिती गोंधळ एके ठायीं ॥२॥
वेदाचे पाठक सेवितील मद्य । न देखती भेद विषयीं भांड ॥३॥
तुका म्हणे किती करावे फजित । तेचि छंद नित्य बहु होती ॥४॥

अर्थ

मागे संतानी जे जे काही सांगितले आहे,ते आता प्रत्येक्ष अनुभवला येऊ लागले.कलियुगात लोक सदाचारी न बनता दुराचारी बनतील.पुण्य कमी होऊन पाप वाढत जाईल.चांगल्या वाईटाचा कोणी विचार करणार नाही.सर्वजण एकत्र येऊन दुराचारी बनतील.एका ठिकाणी मिळून सर्व गोंधळ घालतील.वेद पठण करणारे मद्य पदार्थांचे सेवन करतील.चांगला वाईट विचार न करता भांडतील.तुकाराम महाराज म्हणतात त्यांची किती जरी फजिती केली,तरी त्यांचे दुराचारी छंद नित्याने वाढत जातील.


अभंग विडिओ स्वरूपात पहा .

मागें संतीं होतें जें जें – संत तुकाराम अभंग

संत  तुकाराम अँप डाउनलोड रा.