देखीचा दिमाख – संत तुकाराम अभंग – 535

देखीचा दिमाख – संत तुकाराम अभंग – 535


देखीचा दिमाख शिंकोनियां दावी । हिऱ्या ऐसी केवीं गारगोटी ॥१॥
मर्‍यादा ते जाणे अरे अभागिया । देवाच्या ऐसिया सकळ मूर्ती ॥ध्रु.॥
काय पडिलासें लटिक्याचे भरी । वोंवाळुनि थोरी परती सांडीं ॥२॥
तुका म्हणे पुढें दिसतसे घात । करितों फजित म्हणउनी ॥३॥

अर्थ

दुसर्‍याचे पाहून शिकुन आपण मोठे पणा दाखविला,तर तो काही खरा नव्हे.गारगोट्या हिऱ्यासारख्याकशा होतील?महाराज म्हणतात हे अभागी माणसा,आपणच सर्वश्रेष्ठ आहोत हे समजणे योग्य नाहि,कारण सर्वां मध्ये एकच चैतन्य मूर्ती आहे हे तू जाणून घे.खोट्या मोठ्यापाण च्या भरीला काय पडलास?हा मोठे पाणाचा गर्व तू दूर कर .तुकाराम महाराज म्हणतात पुढे तुझा घात होणार आहे हे मनला माहित आहे,म्हणून मी तुझी निंदा करून मी तुला परमार्थाचा मार्ग दाखवीत आहे.


अभंग विडिओ स्वरूपात पहा .

देखीचा दिमाख – संत तुकाराम अभंग

संत  तुकाराम अँप डाउनलोड रा.