काय नाहीं लवत झाडें – संत तुकाराम अभंग – 534

काय नाहीं लवत झाडें – संत तुकाराम अभंग – 534


काय नाहीं लवत झाडें । विसरे वेडें देहभाव ॥१॥
जया न फळे उपदेश । धस ऐसे त्या नांव ॥ध्रु.॥
काय नाहीं असत जड । दगड तो अबोलणा ॥२॥
तुका म्हणे कुचर दाणा । तैसा म्हणा डेंग हा ॥३॥

अर्थ

वारा आल्या नंतर झाड लवत नाही का? नास्तिक लोकांचे नम्र होणे हे एक प्रकारचे सोंगच आहे व तोच मनुष्य जर म्हणला की मी समाधी अवस्थेम देहाला विसरतो तर ते मला न पटण्या सरखेच आहे, वेडा मनुष्य देहभाव विसरत नाही काय.ज्या कोणाला परमार्थाचा उपदेश रूचत नाही,त्या व्यक्तीला अविचारी,अज्ञानी असे म्हणतात.दगड बोलत नाही कारण तो जड असतो.तुकाराम महाराज म्हणतात टणक दान शिजत नाही, अज्ञानी माणूस परमार्थाच्या बाबतीती तो अज्ञानी तसाच असतो.


अभंग विडिओ स्वरूपात पहा .

काय नाहीं लवत झाडें – संत तुकाराम अभंग

संत  तुकाराम अँप डाउनलोड रा.