चालावा पंथ तो पाविजे – संत तुकाराम अभंग – 533
चालावा पंथ तो पाविजे त्या ठाया । ऐकिल्या वांयां वारता त्या ॥१॥
ऐका जी वोजे पडतसें पायां । भावचि तें जाया वाट नव्हे ॥ध्रु.॥
व्याली कुमारीचा अनुभवें अनुभव । सांगतां तो भाव येत नाहीं ॥२॥
तुका म्हणे येथें पाहिजे आरालें । बिंबीं निवळलें तरि भासे ॥३॥
अर्थ
अशा मार्गाने जावा की,तो मार्ग आपणास जेथे पोहचावयाचे आहे,तेथे बरोबर घेवून जातो.एकदा कि आपण तेथे पोहचलो,कि मग पूर्वीच्या ऐकलेल्या वाट व्यर्थ होतात.मी पाया पडून तुम्हाला सांगत आहे,ते एकाग्रतेने श्रवण करा.परमेश्वरा जवळ जाण्यासाठी अंतःकरणात शुद्ध,निस्वार्थ प्रेम हेच महत्वाचे आहे.प्रसुतीच्या वेदना बाळंतबाईस माहित असतात.त्या कुमारीकेस सांगता येत नाही.तुकाराम महाराज म्हणतात ईश्वराचा अनुभव येण्यासाठी हृदय शुद्ध झाले पाहिजे सूर्या समोर ढग आले कि सूर्य दिसत नाही,त्या प्रमाणे अंतरंगात संकल्प विकल्प निर्माण झाले,तर आत्म सूर्य दिसत नाही.सर्व प्प्रकाचा शंका नाहीसाया झाल्या कि,स्वच्छ स्वरुपात आत्म सूर्य पूर्ण प्रकाशाने दिसू लागतो.
अभंग विडिओ स्वरूपात पहा .
चालावा पंथ तो पाविजे – संत तुकाराम अभंग
संत तुकाराम अँप डाउनलोड करा.