गावे म्हणउनि गीत – संत तुकाराम अभंग – 529

गावे म्हणउनि गीत – संत तुकाराम अभंग – 529


गावे म्हणउनि गीत । धरुनि राहे तैसें चित्त ॥१॥
हेचि थोर अवघड आहे । अन्न देखोनि भूक राहे ॥ध्रु.॥
ऐकावी ह्मूण कथा । राहे तैसें धरुनि चित्ता ॥२॥
तुका म्हणे धणी । नव्हे जेविल्यावांचुनि ॥३॥

अर्थ

आपण हरीचे गुणगान गातो,ते स्वरूप चित्तात धरून ठेवावे.त्याच्या अर्थाकडे लक्ष द्यावे.पण हेच काम फार कठीण आहे.नुसते अन्न पाहून माणसाची भूक कधी भागेल काय?हरीची कथा श्रवण केल्यावर ती हृदयपटलावर तशीच कोरून ठेवायची आहे,हे लक्षात घ्यावे.तुकाराम महाराज म्हणतात प्रत्येक्ष भोजन केल्या शिवाय तृप्ती होत नाहि,त्याप्रमाणे अंतःकरणापासून हरीचे नाम घेतल्याशिवाय खरे समाधान लागत नाही.


अभंग विडिओ स्वरूपात पहा .

गावे म्हणउनि गीत – संत तुकाराम अभंग

संत  तुकाराम अँप डाउनलोड रा.