एक मन तुझ्या अवघ्या – संत तुकाराम अभंग – 528

एक मन तुझ्या अवघ्या – संत तुकाराम अभंग – 528


एक मन तुझ्या अवघ्या भांडवला । वांटितां तें तुला येईल कैसें ॥१॥
म्हणउनि दृढ धरीं पांडुरंग । देहा लावीं संग प्रारब्धाचा ॥ध्रु.॥
आणिका संकल्पा नको गोऊं मन । तरीच कारण साध्य होय ॥२॥
तुका म्हणे ऐसें जाणावें उचित । तरी सहज स्थित येईल कळों ॥३॥

अर्थ

तुझे मन विविध व्यवहाराकडे कसे बरे वाटून घेता येईल?तू आपला देह प्रारब्धाच्या स्वाधीन कर.तू आपल्या मनात पांडूरंगाचे दृढ चिंतन कर.याशिवाय इतर कोणत्याही संकल्पामध्ये तू आपल्या मनाला गुंतवून ठेऊ नकोस.असे केलेस तर जीवनाचे ध्येय जे परमार्थ, ते तुला साध्य होईल.तुकाराम महाराज म्हणतात असे उचित जे आहे,ते तू जाणावे.त्यामुळे आत्मस्थिती कशी असते,हे आपोआप समजून येते.


अभंग विडिओ स्वरूपात पहा .

एक मन तुझ्या अवघ्या – संत तुकाराम अभंग

संत  तुकाराम अँप डाउनलोड रा.