उचित न कळे इंद्रियाचे – संत तुकाराम अभंग – 527
उचित न कळे इंद्रियाचे ओढी । मुखें बडबडी शिकलें तें ॥१॥
आपण जाऊन न्यावे नरकास । बळें बेताळीस कुळें जग ॥ध्रु.॥
अबोलणें बोले डोळे झांकुनियां । बडबडी वांयां दंभासाठीं ॥२॥
तुका म्हणे आम्हीं तेथील पारखी । नाचे देखोवेखीं जाणों खरें ॥३॥
अर्थ
जे इंद्रियाच्या ओढीमुळे त्याच्या पूर्ण पणे आहारी गेलेले असतात,त्यांना योग्य काय व अयोग्य काय,हे कळत नाही.आपल्या गुरूजवळ जे शिकलेले असतात,त्याची ते व्यर्थ बडबड करत असतात.तो स्वतःतर नरकाला जातोच,पण त्याच्या बरोबर पूर्वजांची बेचाळीस कुळे नरकात नेतो.ते डोळे झाकून बसतात,पण त्यात दांभिकपणा त्यांच्या अंगी भरलेला असतो.ब्रम्ह कळले असा आव आणून विषया विषयी ते शाब्दिक बडबड करत असतात .तुकाराम महाराज म्हणतात आम्ही त्याची उत्तम तऱ्हेने पारख करतो.जो दुसर्याचे पाहू ढोंगाने नाचतो,त्याचे खरे स्वरूप काय आहे,हे आम्हास चांगलेच समजते.
अभंग विडिओ स्वरूपात पहा .
उचित न कळे इंद्रियाचे – संत तुकाराम अभंग
संत तुकाराम अँप डाउनलोड करा.