पदोपदीं दिलें अंग – संत तुकाराम अभंग – 525

पदोपदीं दिलें अंग – संत तुकाराम अभंग – 525


पदोपदीं दिलें अंग । जालें सांग कारण ॥१॥

रुंधवूनि ठेलों ठाव । जागा वाव सकळ ॥ध्रु.॥

पुढती चाली मनालाहो । वाढे देही संतोष ॥२॥

तुका म्हणे क्षरभागीं । जालों जगीं व्यापक ॥३॥

अर्थ

माझे जीवन हरीला पदोपदी दिल्यामुळे माझे सर्व कार्य आता पूर्ण झाले आहे.जेवढी म्हणून रिकामी जागा होती,म्हणजे पृथ्वी,आकाश,पाताळ ती सर्व व्यापून मी राहिलो आहे.मनाचे सर्व व्यवहार आनंदाने होत आहेत.संतोषामुळे, देह पुष्ट बनत आहे.तुकाराम महाराज म्हणतात हरीच्या क्षर व अक्षर याउपाणी पैकी मी क्षर रुप जगाच्या आत,बाहेर मी सर्वत्र व्यापून राहिलो आहे.


अभंग विडिओ स्वरूपात पहा .

पदोपदीं दिलें अंग – संत तुकाराम अभंग

संत  तुकाराम अँप डाउनलोड रा.