आमुच्या हें आलें भागा – संत तुकाराम अभंग – 523

आमुच्या हें आलें भागा – संत तुकाराम अभंग – 523


आमुच्या हें आलें भागा । जीव्हार या जगाचें ॥१॥
धरूनियां ठेलों जीवें । बळकट भावें एकविध ॥ध्रु.॥
आणूनियां केला रूपा । उभा सोपा जवळी ॥२॥
तुका म्हणे अंकित केला । खालीं आला वचनें ॥३॥

अर्थ

सर्व विश्वाचे जे जीवन,विठ्ठल तो आमुच्या वाट्याला आला आहे.याच्या ठिकाणी बळकट भावाने मी सर्व वृत्ती स्थिर केल्या आहे.या निर्गुणरूप देवाच्या सगुण रुपास जाणले आहे.तुकाराम महाराज म्हणतात निस्वार्थ प्रेमाने त्यांना आधीन केले आणि भक्ती प्रेमात रंगण्या साठी तो पृथ्वीवर पंढरपुरात आला आहे.


अभंग विडिओ स्वरूपात पहा .

आमुच्या हें आलें भागा – संत तुकाराम अभंग

संत  तुकाराम अँप डाउनलोड रा.