स्त्रीपुत्रादिकीं राहिला आदर – संत तुकाराम अभंग – 519

स्त्रीपुत्रादिकीं राहिला आदर – संत तुकाराम अभंग – 519


स्त्रीपुत्रादिकीं राहिला आदर । विषयीं पडिभर अतिशय ॥१॥
आतां सोडवणे धांवा नारायणा । मज हे वासना अनावर ॥ध्रु.॥
येउनियां आड ठाके लोकलाज । तों हें दिसे काज अंतरलें ॥२॥
तुका म्हणे आम्हां जेथें जेथें गोवा । तेथें तुह्मीं देवा सांभाळावें ॥३॥

अर्थ

स्त्री व पुत्र यांच्याविषयी माझ्या मनामध्ये आदर आहे आणि विषयाच्या अतिशय मी भरीस पडलो आहे. हे नारायणा आता मला सोडवण्यासाठी तुम्ही धाव घ्या वासना मला आता अनावर झाले आहे. जर लोकलज्जा आडवे येऊ लागेल तर परमार्थ कार्य माझ्यापासून अंतरेल असेच मला दिसत आहे. तुकाराम महाराज म्हणतात देवा आम्ही जिथे जिथे बंधनात गुंतण्याची शक्यता आहे तेथे तुम्ही आमचे रक्षण करा आम्हाला तुम्ही सांभाळा.


अभंग विडिओ स्वरूपात पहा .

स्त्रीपुत्रादिकीं राहिला आदर – संत तुकाराम अभंग

संत  तुकाराम अँप डाउनलोड रा.