खरें नानवट निक्षेपीचें जुनें – संत तुकाराम अभंग – 517
खरें नानवट निक्षेपीचें जुनें । काढिलें ठेवणें समर्थाचें ॥१॥
मजुराच्या हातें मापाचा उकल । मी तों येथें फोल सत्ता त्याची ॥ध्रु.॥
कुल्लाळाच्या हातें घटाच्या उत्पत्ती । पाठवी त्या जाती पाकस्थळा ॥२॥
तुका म्हणे जीवन तें नारायणीं । प्रभाते किरणी प्रकाशाची ॥३॥
अर्थ
समर्थ संतांच्या घरी विठ्ठलरूपी जुनाट नाणे जमिनीमध्ये पुरून ठेवले होते.ते मी आधी बाहेर काढले.धान्य मालकाचेच असते,मजुराच्या हाताने त्याचे माप होत असते.त्या प्रमाणे विठ्ठलरूपी ठेवा उघड करणारा मी मजूर आहे व खरी सत्ता त्याचीच आहे.कुंभार स्वतःच्या हाताने घटाची निर्मिती करतो पण योग्यते नुसार पाकशाळेत दुसराच कोणीतरी पाठवीत असतो.त्या प्रमाणे ज्ञान ठेवा उघड करून सांगण्यासाठी संतानी मला आज्ञा केली.त्या आज्ञे प्रमाणे मी कार्य करीत आहे.तुकाराम महाराज म्हणतात सूर्यकिरणातच प्रकाश असतो,तसेच आमचे जीवन नारायणाने व्यापले आहे.
अभंग विडिओ स्वरूपात पहा .
खरें नानवट निक्षेपीचें जुनें – संत तुकाराम अभंग
संत तुकाराम अँप डाउनलोड करा.