दिन रजनीं हाचि धंदा – संत तुकाराम अभंग – 516
दिन रजनीं हाचि धंदा । गोविंदाचे पवाडे ॥१॥
संकल्पिला देह देवा । सकळ हेवा ते ठायीं ॥ध्रु.॥
नाहीं अवसान घडी । सकळ जोडी इंद्रियां ॥२॥
कीर्ती मुखें गर्जे तुका । करी लोकां सावध ॥३॥
अर्थ
दिवस रात्र आम्ही एकच काम करतो,ते म्हणजे भगवंताच्या लीला विलासाचे गुणगान करणे.आम्ही हा देह देवाला समर्पण केला असून आमचे सर्व संकल्प देवाविषयीचे आहेत.सर्व इंद्रियांच्या वृत्ती देवाकडे वळविल्या असून या शिवाय दुसरी भावना क्षण भर देखील निर्माण होत नाही.तुकाराम महाराज म्हणतात देवाची कीर्ती आम्ही गर्जना करून सांगत आहोत आणि सर्व लोकांना सावध करीत आहोत.
अभंग विडिओ स्वरूपात पहा .
दिन रजनीं हाचि धंदा – संत तुकाराम अभंग
संत तुकाराम अँप डाउनलोड करा.