धन्य काळ संत भेटी – संत तुकाराम अभंग – 515

धन्य काळ संत भेटी – संत तुकाराम अभंग – 515


धन्य काळ संत भेटी । पायीं मिठी पडिली तो ॥१॥
संदेहाची सुटली गांठी । झालो पोटीं शीतळ ॥ध्रु.॥
भवनदीचा जाला तारा । या उत्तरा प्रसादें ॥२॥
तुका म्हणे मंगळ आतां । कोण दाता याहुनि ॥३॥

अर्थ

संतांच्या चरणांशी मिठी पडते तो काळ फारच धन्य होय.त्यांच्या भेटीमुळे संशयाच्या सर्व गाठी सुटून जातात.त्यामुळे मन शांत आणि प्रसन्न होते.संतांच्या कृपाप्रसादाने भवनदीच नाव(नौका) बनते आणि पैलीतीरी किनाऱ्यावर उतरविते.तुकाराम महाराज म्हणतात संतांच्याही पेक्षा अधिक मंगलकारक असा कोण बरे दाता आहे?


अभंग विडिओ स्वरूपात पहा .

धन्य काळ संत भेटी – संत तुकाराम अभंग

संत  तुकाराम अँप डाउनलोड रा.