हींच त्याची पंचभूतें – संत तुकाराम अभंग – 513
हींच त्याची पंचभूतें । जीवन भातें प्रेमाचें ॥१॥
कळवळा धरिला संतीं । ते निगुती कैवाड ॥ध्रु.॥
हाच काळ वर्तमान । समाधान ही संपत्ती ॥२॥
तुका म्हणे दिवसरातीं । हेचि खाती अन्न ते ॥३॥
अर्थ
ईश्वराविषयीचे प्रेम हेच या भक्तांचे जीवनदायी अन्न आणि पंचमहाभूतात्मक शरीर असते.संतानी हरी विषयीचा कळवळ चित्तामध्ये धारण केला आहे आणि तसाच निर्धार करून त्याचा स्वीकार केला आहे.नेहमी समाधान रुपी संपत्ती जवळ बाळगणे हा त्यांचा वर्तमान काळ असतो.त्यांच्या हृदयात अखंड समाधान नांदत असते.त्यामुळे त्यांना सर्व काळ सारखाच वाटत असतो.तुकाराम महाराज म्हणतात हरी भक्त हे रात्रंदिवस प्रभूप्रेमच्या ब्रम्ह रसाचे भोजन करत असतात.
अभंग विडिओ स्वरूपात पहा .
हींच त्याची पंचभूतें – संत तुकाराम अभंग
संत तुकाराम अँप डाउनलोड करा.