उदंड शाहाणे होती – संत तुकाराम अभंग – 509

उदंड शाहाणे होती – संत तुकाराम अभंग – 509


उदंड शाहाणे होती तर्कवंत । परि नेणवेचि अंत विठोबाचा ॥१॥
उदंडा अक्षरां करोत भरोवरी । परि नेणेवेची थोरी विठोबाची ॥२॥
तुका म्हणे नाहीं भोळेपणाविण । जाणीव ते सिण रितें माप ॥३॥

अर्थ

नाना प्रकारचे तर्क करणारे बुद्धिवंत,शहाणे लोक अनेक आहेत,परंतु विठ्ठलच्या स्वरूपाचा त्यांना अंत लागत नाही.परमार्थातील अक्षरे घोकून पाठ कारणारे आणि अभ्यासाचा त्रास घेणारे लोक अनेक आहेत,त्यांनाही विठ्ठलाची खरी थोरवी समजत नाही.तुकाराम महाराज म्हणतात ज्ञानाचे माप किती थोर असले,तरी रितेच असते.यासाठी निस्वार्थ अशी भोळी भाबडी भक्ती करून परमार्थ साधावा.


अभंग विडिओ स्वरूपात पहा .

उदंड शाहाणे होती – संत तुकाराम अभंग

संत  तुकाराम अँप डाउनलोड रा.