सकळ धर्म मज – संत तुकाराम अभंग – 508
सकळ धर्म मज विठोबाचें नाम । आणीक ते वर्म नेणें कांहीं ॥१॥
काय जाणों संतां निरविलें देवें । करिती या भावें कृपा मज ॥२॥
तुका म्हणे माझा कोण अधिकार । तो मज विचार कळों यावा ॥३॥
अर्थ
विठोबाचे नाम घेतले की,यामध्ये सर्व धर्म घडतात.देवाच्या निस्वार्थ प्रेम शिवाय मी दुसरे कोणतेही गूढ वर्म जाणत नाही.देवाने मला संतांच्या स्वाधीन केलेले दिसते,कारण तेही माझ्या वर कृपा करतात.तुकाराम महाराज म्हणतात माझा कोणता अधिकर आहे की,संतांनी त्यांचे प्रेम मला देऊन मला त्यांनी मला भक्तीचा मार्ग समजून सांगावा.
अभंग विडिओ स्वरूपात पहा .
सकळ धर्म मज – संत तुकाराम अभंग
संत तुकाराम अँप डाउनलोड करा.