माझ्या विठोबाचा कैसा प्रेमभाव – संत तुकाराम अभंग – 507

माझ्या विठोबाचा कैसा प्रेमभाव – संत तुकाराम अभंग – 507


माझ्या विठोबाचा कैसा प्रेमभाव । आपणचि देव होय गुरू ॥१॥
पडियें देहभावे पुरवी वासना । अतीं तें आपणापाशीं न्यावें ॥ध्रु.॥
मागें पुढें उभा राहे सांभाळीत । आलिया आघात निवारावे ॥२॥
योगक्षेम त्याचे जाणे जडभारी । वाट दावी करीं धरूनियां ॥३॥
तुका म्हणे नाहीं विश्वास ज्या मनीं । पाहावें पुराणीं विचारूनी ॥४॥

अर्थ

माझ्या विठोबाचा प्रेम भाव कसा आहे म्हणून सागू?तो देव रूपाने कृपा करतो व गुरुच देव आहे.भक्तांसाठी देह धरण करून त्यांची इच्छा पुरवतो आणि शेवटी आपणा जवळ घेऊन जातो.तो भक्तांच्या मागे पुढे उभा राहून त्यांचा सांभाळ करतो भक्तांच्या संकटाचे निवारण करतो.भक्तांचे संकट जाणून त्यांचे योग क्षेम निवारण करतो आणि भक्तांच्या हाताला धरून भक्ती मार्गाची वाट हि दाखवितो.तुकाराम महाराज म्हणतात या वाचनावर ज्यांचा विश्वास नाही,त्यांनी पुराणातील अनेक उदाहरणे पहावीत.


अभंग विडिओ स्वरूपात पहा .

माझ्या विठोबाचा कैसा प्रेमभाव – संत तुकाराम अभंग

संत  तुकाराम अँप डाउनलोड रा.