उद्धाराचा संदेह नाहीं – संत तुकाराम अभंग – 504

उद्धाराचा संदेह नाहीं – संत तुकाराम अभंग – 504


उद्धाराचा संदेह नाहीं । याच्या कांहीं सेवकां ॥१॥
पांडुरंग अभिमानी । जीवदानी कोंवसा ॥ध्रु.॥
बुडतां जळीं जळतां आगी । ते प्रसंगीं राखावें ॥२॥
तुका म्हणे आम्हांसाठी । कृपा पोटीं वागवी ॥३॥

अर्थ

देव आपला उद्धार करील की,नाही याची सेवकाच्या मनात कधी शंका येत नाही.आपल्या भाक्तांबद्द्ल पांडुरंगाला अभिमान असतो.संकट काळी तो भक्ताला जीव दान देतो.पाण्यात बुडण्याच्या वेळी,अग्नीत जाळन्याच्या प्रसंगी हा भक्तांचे नेहमीच संरक्षण करत असतो.भक्त प्रल्हादाचे त्याने संरक्षण केले.तुकाराम महाराज म्हणतात हा देव,आमच्यावर देखील कृपेचा वर्षाव करत असतो.


अभंग विडिओ स्वरूपात पहा .

उद्धाराचा संदेह नाहीं – संत तुकाराम अभंग

संत  तुकाराम अँप डाउनलोड रा.