चिंतिलें तें मनिंचे जाणें – संत तुकाराम अभंग – 503

चिंतिलें तें मनिंचे जाणें – संत तुकाराम अभंग – 503


चिंतिलें तें मनिंचे जाणें । पुरवी खुणे अंतरींचें ॥१॥
रात्री न कळे दिवस न कळे । अंगीं खेळे दैवत हें ॥ध्रु.॥
नवसियाचे पुरवी नवस । भोगी त्यास भिन्न नाहीं ॥२॥
तुका म्हणे समचि देणें । समचरण उभा असे ॥३॥

अर्थ

आपण मनामध्ये जी काही गोष्टीचे चिंतन करतो ते सर्व देव जाणतो व आपल्या अंतरंगातील सर्व खुणा तो ओळखून पूर्ण करतो. असे हे पांडुरंग नावाचे दैवत आहे त्याला रात्र ही कळत नाही आणि दिवसही कळत नाही ते माझ्या अंगामध्ये सारखे खेळतच असते. परमार्थामध्ये जो कोणी परमार्थासाठी उपयुक्त असणारा नवस बोलतो त्याचे नवस हे दैवत पूर्ण करते व त्या भक्तांचे सर्व सुख दुखादी भोग हे दैवत स्वतः भोगते व त्यांच्यापासून भिन्न राहत नाही. तुकाराम महाराज म्हणतात हरीचे देणे हे सारख्या प्रमाणात आहे अगदी तो जसा विटेवर त्याचे समचरण ठेवून उभा आहे अगदी तसेच.


अभंग विडिओ स्वरूपात पहा .

चिंतिलें तें मनिंचे जाणें – संत तुकाराम अभंग

संत  तुकाराम अँप डाउनलोड रा.