संत तुकाराम अभंग

आहाकटा त्याचे करिती – संत तुकाराम अभंग – 50

आहाकटा त्याचे करिती – संत तुकाराम अभंग – 50


आहाकटा त्याचे करिती पितर ।
वंशीं दुराचार पुत्र झाला ॥१॥
गळेचि ना गर्भ नव्हेचि कां वांज ।
माता त्याची लाजलावा पापी ॥ध्रु.॥
परपीडें परद्वारीं सावधान ।
सादरचि मन अभाग्याचें ॥२॥
न मळितां निंदा चाहडी उपवास ।
संग्रहाचे दोष सकळ ही ॥३॥
परउपकार पुण्य त्या वावडें ।
विषाचें तें कीडें दुग्धीं मरे ॥४॥
तुका म्हणे विटाळाचीच तो मूर्ति ।
दया क्षमा शांति नातळे त्या ॥५॥

अर्थ
ज्या घरामधे दुर्वर्तनी पुत्र जन्माला येतो, त्याचे पीतर दुःखाने आक्रोश करत असतात .अश्या पुत्रांचा त्याच्या मातेच्या उदरात असतानाच गर्भपात का झाला नाही? त्याची माता वांझ का राहिली नाही? अश्या पुत्राला तिने का बरे जन्म दिला? अशा अभाग्याचे मन सतत परपीड़ा, परनिंदा करण्यात रमते .त्याला एखाद्या दिवशी निंदा, चहाडी करण्यास मिळाली नाही तर उपवास घाडल्याप्रमाणे वाटते .परोपकार, पूण्य यांचे त्याला वावडे असते जसे विषारी कीडे दुधात टाकल्यावर मरून जातात तसाच हा आहे .तुकाराम महाराज म्हणतात, असा मनुष्य साक्षात विटाळाची मूर्ति असतो; त्याच्या मनामधे दया, क्षमा, शांतीचा लवलेश नसतो .


हा अभंग विडिओ स्वरूपात पहा .


आहाकटा त्याचे करिती – संत तुकाराम अभंग

संत ज्ञानेश्वर अँप डाउनलोड रा.

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *