अंतरिचीं घेतो गोडी – संत तुकाराम अभंग – ५

अंतरिचीं घेतो गोडी – संत तुकाराम अभंग – ५


अंतरिचीं घेतो गोडी ।
पाहे जोडी भावाची ॥१॥
देव सोयरा देव सोयरा ।
देव सोयरा दीनाचा ॥ध्रु.॥
आपुल्या वैभवें ।
शृंगारावें निर्मळे ॥२॥
तुका म्हणे जेवी सवें ।
प्रेम द्यावें प्रीतीचें ॥३॥

अर्थ
परमेश्वर भक्ताच्या अतःकरणातील भक्तिचि गोडी स्विकारतो आणि त्याच्या अतःकरणातील भाव पाहतो .देव भक्ताचा सोयरा झालेला असतो असे महाराज तीन वेळा म्हणतात.आपुल्या जवळ जे वैभव आहे मग ते कसे का असेना पण ते वैभवाच निर्मळमानाने देव समजावे.तुकाराम महाराज म्हणतात तो हरी भक्तांबरोबर भोजन करतो व त्याच्यावर आपल्या प्रेमाचा वर्षाव करावा .


हा अभंग विडिओ स्वरूपात पहा .

 


अंतरिचीं घेतो गोडी – संत तुकाराम अभंग

संत  तुकाराम अँप डाउनलोड रा.