सर्व सुखें आजी येथेचि – संत तुकाराम अभंग – 496

सर्व सुखें आजी येथेचि – संत तुकाराम अभंग – 496


सर्व सुखें आजी येथेचि वोळलीं । संतांचीं देखिलीं चरणांबुजें ॥१॥
सर्वकाळ होतों आठवीत मनीं । फिटली ते धणी येणें काळें ॥२॥
तुका म्हणे वाचा राहिली कुंटित । पुढें झालें चित्त समाधान ॥३॥

अर्थ

आज मी संतांची चरणकमले पाहिली त्यामुळे सर्व सुख येथे आली आहेत.सर्वकाळ सारखे संतांचे चरणाची मी आठवत होतो आता त्यांचे दर्शन झाले त्यामुळे यावेळी माझ्या सर्व इच्छा पूर्ण झाल्या.तुकाराम महाराज म्हणतात आता या संबंधी काहीच बोलता येत नाही.माझे चित्त समाधान पावले आहे.


अभंग विडिओ स्वरूपात पहा .

सर्व सुखें आजी येथेचि – संत तुकाराम अभंग

संत  तुकाराम अँप डाउनलोड रा.