धिग जिणें ज्याचा स्वामी – संत तुकाराम अभंग – 494
धिग जिणें ज्याचा स्वामी हीन वर । मरण तें बरे भलें मग ॥१॥
आईका जी देवा ऐसी आहे नीत । काय तें उचित सांभाळावें ॥ध्रु.॥
देशोदेशीं धाक जयाच्या उत्तरें । तयाचें कुतरें तरि भलें ॥२॥
तुका म्हणे हें कां सुचलें उत्तर । जाणोनि अंतर ओळखावें ॥३॥
अर्थ
अहो ज्याचा स्वामीचा दुर्बळ आहे हिन आहे त्या माणसाचे जगणे व्यर्थ आहे त्यापेक्षा त्याला मरण आलेले बरे.म्हणून देवा तुम्ही ऐका नीती अशीच आहे म्हणून जे योग्य असेल,उचित असेल तेच तुम्ही करावे.ज्याच्या शब्दाचा दरारा देशोदेशी आहे,त्याच्या घरी श्वान होणे ही बरे. तुकाराम महाराज म्हणतात मी असे कठोर का बोलतो,असे बोलावेसे मला का वाटले,ते आपण जाणून घ्यावे.
अभंग विडिओ स्वरूपात पहा .
धिग जिणें ज्याचा स्वामी – संत तुकाराम अभंग
संत तुकाराम अँप डाउनलोड करा.