काय देह घालूं करवती – संत तुकाराम अभंग – 492
काय देह घालूं करवती कर्मरी । टाकुं या भितरी अग्नीमाजी ॥१॥
काय सेवूं वन शीत उष्ण तहान । साहों कीं मौन धरुनी बैसों ॥ध्रु.॥
काय लावूं अंगीं भस्म उधळण । हिंडूं देश कोण खुंट चारी ॥२॥
काय त्यजूं अन्न करूनि उपास । काय करूं नाश जीवित्वाचा ॥३॥
तुका म्हणे काय करावा उपाव । ऐसा देई भाव पांडुरंगा ॥४॥
अर्थ
देवा आता तुमची माझी भेट होण्यासाठी मी माझ्या देहावर करवत चालवून घेऊ का, का माझ्या शरीराला अग्नीमध्ये टाकून देऊ?वना मध्ये जाऊन, शीत उष्ण,तहान याचे ताप सहन करू कि मौन घेऊन बसू,कि सर्व अंगाला भस्म फासू?देशांतराला जाऊ कि चारी दिशा फिरू?अरे देवा मग मी अन्नत्याग करू ठीक आहे कि माझ्या जीवाचं नाश करून घेऊ?तुकाराम महाराज म्हणतात तुझ्या भेटी करिता काय उपाय करू ते सांग?
अभंग विडिओ स्वरूपात पहा .
काय देह घालूं करवती – संत तुकाराम अभंग
संत तुकाराम अँप डाउनलोड करा.