एकादशीव्रत सोमवार न करिती ।
कोण त्यांची गति होईल नेणों ॥१॥
काय करूं बहु वाटे तळमळ ।
आंधळीं सकळ बहिर्मुख ॥ध्रु.॥
हरीहरां नाहीं बोटभरी वाती ।
कोण त्यांची गति होईल नेणों ॥२॥
तुका म्हणे नाहीं नारायणीं प्रीति ।
कोण त्यांची गति होईल नेणों ॥३॥
अर्थ
जे कोणी एकादशी आणि सोमवार हे व्रत करत नाही त्यांची गत काय होईल काय माहित? काय करावे सर्व लोकांचे कल्याण व्हावे यासाठी खूप तळमळ वाटते परंतु हे सर्वच संसारिक लोक आंधळी व बहिर्मुख आहेत. हरी व हर म्हणजे हरी आणि शंकर या दोन देवतांना जे लोक बोटभर वातीने देखील ओवाळत नाही त्यांची गती काय होईल हे काही कळत नाही. तुकाराम महाराज म्हणतात ज्या कोणाला नारायणा विषयी आवडच नाही त्यांची गती काय होईल ते काही मला कळतच नाही.
हा अभंग विडिओ स्वरूपात पहा .
संत ज्ञानेश्वर अँप डाउनलोड करा.