देऊं ते उपमा – संत तुकाराम अभंग – 488
देऊं ते उपमा । आवडीनें पुरुषोत्तमा ॥१॥
पाहातां काशा तूं सारिखा । तिंहीं लोकांच्या जनका ॥ध्रु.॥
आरुष हे वाणी । गोड करूनि घेतां कानीं ॥२॥
आवडीनें खेळे । तुका पुरवावे सोहळे ॥३॥
अर्थ
ते पुरुषोत्तमा तुला आवडीने जरी मी एखादी उपमा द्यायचे म्हटले तरी. हे त्रैलोक्यजनका त्रैलक्यामध्ये तू कोणा सारखा आहे हे पाहण्यास केले तर तेही समजत नाही.माझी वेडी भाबडी भाषा तुम्ही गोड मानून ऐकता.त्यातच मला धन्यता आहे.तुकाराम महाराज म्हणतात तुमच्या आधारने मी आंनदाने रहातो माझे लाड तुम्हीच पुरवावे.
अभंग विडिओ स्वरूपात पहा .
देऊं ते उपमा – संत तुकाराम अभंग
संत तुकाराम अँप डाउनलोड करा.