तुम्हां ठावा होता देवा – संत तुकाराम अभंग – 487
तुम्हां ठावा होता देवा । माझें अंतरींचा हेवा ॥१॥
होती काशानें सुटका । तरि हे वैकुंठनायका ॥ध्रु.॥
नसतें सांभाळिलें । जरि तुम्हीं आश्वासिलें ॥२॥
तुका म्हणे कृपाळुवा । बरवा केला सांवाधांवा ॥३॥
अर्थ
देवा माझ्या अंतःकरणातील सर्व इच्छा तुम्हाला माहित होती.हे वैकुंठनायका,माझी सुटका कशाने होईल?तुम्ही जर माझा सांभाळ केला नसता,तर माझी सुटका झालीच नसती.तुकाराम महाराज म्हणतात हे कृपाळू देवा,माझी सुटका करण्यासाठी तुम्ह्नी धावाधाव केली हे फार बरे झाले.
अभंग विडिओ स्वरूपात पहा .
तुम्हां ठावा होता देवा – संत तुकाराम अभंग
संत तुकाराम अँप डाउनलोड करा.