बरगासाठी खादलें शेण – संत तुकाराम अभंग – 485

बरगासाठी खादलें शेण – संत तुकाराम अभंग – 485


बरगासाठी खादलें शेण । मिळतां अन्न न संडी ॥१॥
फजित तो केला लाहे । ताडण साहे गौरव ॥ध्रु.॥
ओठाळाची ओंगळ ओढी । उगी खोडी नवजाय ॥२॥
तुका फजीत करी बुच्चा । विसरे कुच्चा खोडी तेणें ॥३॥

अर्थ

एका मूर्ख मनुष्याला दुष्काळामध्ये खाण्यासाठी अन्न मिळेना म्हणून त्याने कदान्न खाण्यास सुरुवात केली दुष्काळ निवारण झाले तरी कदान्न खाण्याचे काही सुटेना अशा मूर्खाला कितीही मार दिला त्याची कितीही फजिती केली तरी त्याला काही वाटत नाही.ओढाळ, जनावराला नासधूस करणे आवडते,कचरा खाणे आवडते.त्याची खोड आपल्या आपण जात नाही.तुकाराम महाराज म्हणतात जे निलाजरे कोडगे लोक आहे,त्यांची चागली फजिती केली,तरच ते आपली खोड विसरतात.


अभंग विडिओ स्वरूपात पहा .

बरगासाठी खादलें शेण – संत तुकाराम अभंग

संत  तुकाराम अँप डाउनलोड रा.