आम्हांसी आपुलें नावडे – संत तुकाराम अभंग – 484

आम्हांसी आपुलें नावडे – संत तुकाराम अभंग – 484


आम्हांसी आपुलें नावडे संचित । चरफडी चित्त कळवळ्यानें ॥१॥
न कळतां आला खोळंबा मारगा । जगीं जालों जगा बहुरूपी ॥ध्रु.॥
कळों आलें बरें उघडले डोळे । कर्णधार मिळे तरी बरें ॥२॥
तुका म्हणे व्हाल ऐकत करुणा । तरि नारायणा उडी घाला ॥३॥

अर्थ

आम्हाला आमचे संचित कर्म आवडतच नाही त्यामुळे आम्हाला आमचाच कळवळा येत आहे आणि आमचे चित्त चरफडत आहे.मला माझ्या अज्ञानामुळे अनेक प्रकारचे परमार्थ मार्ग मध्ये खोळंबे आलेआणि जसे जग असेल तसे या प्रकारचे मी सोंग घेऊ लागलो म्हणजे बहुरूपी झालो.हे सारे कळून आले विचारांची दृष्टी घडली आणि आता.असे वाटत आहे कि,या भाव नदीतून पार करणारा नावाडी मिळाला तर किती चं होईल. तुकाराम महाराज म्हणतात हे नारायण,जर हि करून आपण ऐकत असाल,तर आमच्या करता धावत या.


अभंग विडिओ स्वरूपात पहा .

आम्हांसी आपुलें नावडे – संत तुकाराम अभंग

संत  तुकाराम अँप डाउनलोड रा.