उजळलें भाग्य आतां – संत तुकाराम अभंग – 483
उजळलें भाग्य आतां । अवघी चिंता वारली ॥१॥
संतदर्शनें हा लाभ । पद्मनाभ जोडला ॥ध्रु.॥
संपुष्ट हे हृदयपेटी । करूनि पोटीं सांठवूं ॥२॥
तुका म्हणे होता ठेवा । तो या भावा सांपडला ॥३॥
अर्थ
माझे भाग्य उजळले कारण मला संतांचे दर्शन झाले त्यामुळे माझी सर्व चिंता नाहीशी झाली. आणि संतांच्या दर्शना मुळेच पद्मनाभ असा जो हरी त्याचा मला लाभ झाला.मी आपल्या संपुष्ट अशा हृदयरूपी पेटीत देवाला साठवून किंवा सुरक्षित ठेवीन.तुकाराम महाराज म्हणतात देवरूपी ठेवा हा तर माझ्याठीकाणी पहिल्या पासूनच होता,पण तो माझ्या शुध्द भावनेने सापडला.
अभंग विडिओ स्वरूपात पहा .
उजळलें भाग्य आतां – संत तुकाराम अभंग
संत तुकाराम अँप डाउनलोड करा.