आपुलाला लाहो करूं – संत तुकाराम अभंग – 482

आपुलाला लाहो करूं – संत तुकाराम अभंग – 482


आपुलाला लाहो करूं । केणें भरूं हा विठ्ठल ॥१॥
भाग्य पावलों या ठाया । आतां काया कुरवंडी ॥ध्रु.॥
पुढती कोठें घडे ऐसें । बहुतां दिसें फावलें ॥२॥
तुका म्हणे झाली जोडी । चरण घडी न विसंभें ॥३॥

अर्थ

आता आपणच लाहो म्हणजे त्वरा करून चांगला हा विठ्ठल रुपी चांगला माल भरू. माझे भाग्य उदयाला आले त्यामुळे मी या ठिकाणी पोहोचलो आता मी माझ्या शरीराची कुरवंडी करून विठ्ठला वरून वळून टाकीन.कारण असा लाभ पुन्हा कोठे मिळणार आहे?फार दिवसांनी हा लाभ झाला आहे. तुकाराम महाराज म्हणतात त्यांना मी घटका भरही विसंबणार नाही.


अभंग विडिओ स्वरूपात पहा .

आपुलाला लाहो करूं – संत तुकाराम अभंग

संत  तुकाराम अँप डाउनलोड रा.